बदलापूर – बदलापूर ग्रामीण भागातील बेंडशीळ, चिकण्याची वाडी परिसरात गवा पाहायला मिळाला आहे. हा गवा कळपा पासून वाट चुकून या भागात आल्या असल्याचं वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सह्याद्रीच्या रांगांमधील जंगलात गव्याचे कळप आढळून येतात. त्यातीलच एक नर गवा चुकून कळपा पासून बाजूला होऊन बदलापूरच्या ग्रामीण भागात आला आहे. या आधीही दोन वर्षांपूर्वी मुरबाड परिसरात गवा दिसला होता.
नर गवा हा कळपा पासून जरा वेगळ्या रहात असल्याने कधी कधी वाट चुकल्याने तो भटकतो, असाच वाट चुकून हा गवा या परिसरात आल्या असल्याचं वन अधिकार्यांचे म्हणणे आहे. आम्ही या गव्यावर लक्ष ठेवून असून तो पुन्हा हा कळपात सामील होईल असे बदलापूर रेंजचे वनधिकारी विवेक नातू यांनी सांगितलं आहे.