पश्चिम महाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी, मात्र नियतीपुढे पराभूत

कोल्हापूर – सडोली दुमाला येथील ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी नुकताच बिनविरोध निवड झालेल्या संग्राम सीताराम गुरव (वय २७) या युवकाचे डेंग्यूने मंगळवारी रात्री उशीरा निधन झालं. संग्रामची एक्झिट मन हेलावून टाकणारी आहे. या घटनेने सडोली दुमालासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संग्रामला चार दिवसांपूर्वी ताप आला होता. गावी उपचार सुरू होते. उपचार करूनही प्रकृती नाजूक बनल्याने त्याला सोमवारी कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचाराला शरीराने साथ न दिल्याने संग्रामचे निधन झाले. संग्रामचे निधन झाल्याचे समजताच त्याच्या कुटुंबीयांनी फोडलेला टाहो मन हेलावून टाकणारा होता.

सडोली दुमाला ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली होती. यामध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. फक्त सरपंच पदासाठी निवडणूक झाली होती. या बिनविरोध सदस्यात प्रभाग क्रं. ३ मधून संग्रामची निवड करण्यात आली होती. मागील पंचवार्षिक निवडणुकीत तो निवडून आला होता. सलग दुसऱ्यांदा ग्रामपंचायत सदस्य म्हणून तो काम पाहणार होता. तत्पूर्वी काळाने त्याच्यावर घाला घातला.
वारकरी संप्रदायातील संग्राम गावातील सर्व धार्मिक, सामाजिक कार्यात अग्रेसर असायचा. सर्वांशी मिळून मिसळून वागणारा संग्राम असा निघून गेल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment