विदर्भ

मवीआ उमेदवाराने केला आचारसंहितेचा भंग

अमरावती – पदवीधर मतदार संघाचे मविआचे उमेदवार धीरज लिंगाडे विरूद्ध आदर्श आचारसंहिता उल्लंघन केल्याची निवडणूक विभागाकडे तक्रार आल्याने त्या तक्रारींचे गांभीर्य निवडणूक विभागाने घेत पाचही जिल्ह्यातील होर्डिंग काढण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

प्राप्त माहितीनुसार अमरावती पदवीधर मतदार संघाचे मविआचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी अमरावती विभागात मोठे मोठे होर्डिंग वर आपल्या प्रचाराची जाहिरात केली आहे. मात्र या जाहिराती मध्ये मतदान करताना उमेदवाराच्या नावासमोर पसंतीक्रम टाकावा लागतो. मात्र लिंगाडे यांच्या बॅनरवर पसंती क्रमांक लिहून त्यावर बरोबरची खूण मारण्यात आली आहे. ही बाब नियमबाह्य असल्याची तक्रार राष्ट्रीय पदवीधर संघटनेचे सचिव पवन आपकाजे यांनी निवडणूक विभागाकडे दाखल केली आहे.

याची दखल निवडणूक विभागाने घेतली व आज सर्व होर्डीबाग काढण्याचे निर्देश देण्यात आले. निवडणूक विभागाने तत्काळ पाचवी जिल्ह्यातील फ्लेक्स काढून त्याला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी सुद्धा केली आहे. सध्या अमरावती विभागात पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारांनी आपल्या मतदारांकडे जाऊन त्यांच्या भेटी गाठी घेण्यास सुरुवात केली आहे. अमरावती विभागात भाजप आणि महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यात लढत होणार असली तरी इतर उमेदवार हि आपली ताकद आजमावीत आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment