कोंकण

दोषींवर कारवाई न केल्यास उग्र आंदोलन छेडणार : आदिवासी संघटनांचा पोलीस प्रशासनाला इशारा

रोहा : वार्ताहर
पोलीस  कस्टडीत असलेल्या आरोपीचे संरक्षण करणे ही  पोलिसांची जबाबदारी आहे असे असताना पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार आणि निष्काळजीपणामुळे कस्टडीत असलेल्या आरोपी व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.

अशा बेजबाबदार पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच दोषींना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी आदिम कातकरी जमाती संघटनेचे अध्यक्ष दत्तू वाघ व सर्वहारा जनआंदोलन संघटनेचे अध्यक्ष सोपान सुतार यांनी केली आहे.

पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्याकडे  आदीवासी समाज बांधवांसाठी लढणाऱ्या या संघटनांच्यावतीने  लेखी निवेदनद्वारे मागणी केली आहे.दोषींवर कारवाई करून त्यांना निलंबित न केल्यास सर्व संघटना संघटित होऊन संपूर्ण महाराष्ट्राभर उग्र आंदोलन छेडणार असा इशारा देखील  दत्तू वाघ व सोपान सुतार यांनी दिला आहे.                                             …                                   

१४ एप्रिल रोजी पहाटेच्या दरम्यान रोहा पोलीस ठाण्यातील पोलीस कस्टडीत आरोपी रवींद्र वाघमारे यांनी आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यक्षमते बाबत प्रश्न उपस्थित करून अनेक आदीवासी व कातकरी समाजातील संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत पोलीस प्रशासनाला धारेवर धरले आहे. व या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पत्नीच्या खुनातील  आरोपी व्यक्तीने पोलीस कस्टडीत आत्महत्या केल्याचे वृत्त समजताच आदिवासी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झगडणाऱ्या अनेक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रोहा पोलीस ठाण्यात ठीय्या मांडला व या घटनेची सखोल चौकशी करून कर्त्याव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी आदिम कातकरी जमाती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष दत्तू वाघ व सर्वहारा जनआंदोलन संघटनेचे अध्यक्ष सोपार सुतार यांनी केली आहे.

अटकेत असलेला इसम आत्महत्या करतो म्हणजे ही दुर्दैवी बाब असून पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे सदर घटना घडल्याचा आरोप सोपान सुतार यांनी केला आहे.  दरम्यान  संबंधितांवर तातडीने कारवाई न झाल्यास सर्व संघटना एकत्रित येऊन संपूर्ण राज्यावर पोलीस प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन करणार असा इशारा देखील दत्तू वाघ व सोपान सुतार यांनी दिला आहे. 

                                         
 पत्नीची हत्या तर  आरोपीने आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण वाघमारे कुटुंब उघड्यावर पडला आहे. त्याला वयोवृद्ध आई व वडील असून  ४ लहान मुले आहेत.

थोरला मुलगा १० तर लहान मुलगा दीड वर्षाच्या वयोगटातील आहे. या चारही मुलांच्या पालनपोषणाची व शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी अशी मागणी देखील या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

या घटनेची सी.आय.डी., गुन्हे अन्वेषण विभागा मार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल  अशोक दुधे  जिल्हा पोलीस अधीक्षक                                         ..                             

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Comment