पश्चिम महाराष्ट्र

पुण्यात मतदानावर बहिष्कार

पुणे – वेल्हे तालुक्यातील कोदापूर, भोसलेवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत न केल्याने येथील ग्रामस्थांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. मतदानावर बहिष्कार टाकला आहे. उद्या होणाऱ्या ठाणे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कोदापूर व भोसलेवाडी ग्रामस्थ मतदान करणार नाहीत अशी माहिती माजी सरपंच भिमाजी देवगिरीकर यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना भिमाजी देवगिरीकर म्हणाले की, गुंजवणी धरणामध्ये कोदापूर व भोसलेवाडी हे गाव गेले आहे. या गावातील लोकांचे पुनर्वसन दाणे ग्रामपंचायतीच्या शेजारी केली असल्याने दाणे ग्रामपंचायत हे गाव जोडले आहे. गेल्या अनेक वर्षापासून येथील धरणग्रस्त स्वतंत्र ग्रामपंचायतची मागणी करत आहेत. गुंजवणी धरणाच्या तीरावर कोदापूर व भोसलेवाडी येथील ग्रामस्थांचे पुनर्वसन गावठाण १ व गावठाण २ मध्ये करण्यात आलेले आहे. येथील गावठाणामध्ये ४५० नागरिक रहिवासी म्हणून राहत आहेत. येथील माजी सरपंच भिमाजी देवगिरीकर आप्पा देवगिरीकर अधिक कार्यकर्ते स्वतंत्र ग्रामपंचायत व महसुली गाव व्हावे यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करत आहेत. परंतु दरवेळी त्यांच्या पदरी निराशाच येत आहे.

ठाणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये या गावांचा समावेश केल्यामुळे येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय एका बैठकीत घेण्यात आलेला आहे. त्यामुळे उद्या होणारा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये येथील ग्रामस्थ मतदान करणार नाहीत अशी माहिती माजी सरपंच भिमाजी देवगिरीकर यांनी यावेळी दिली. कोदापूर धरणग्रस्तांचा स्वतंत्र महसुली गाव व स्वतंत्र ग्रामपंचायत प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालय मार्फत शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे. मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहे. येथील ग्रामस्थांना मतदान करण्याची विनंती करण्यात आली असल्याचे तहसिलदार शिवाजी शिंदे यांनी सांगितले आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment