विदर्भ

दोन दिवसात वाघाच्या हल्ल्यात तीन ठार

चंद्रपूर – जिल्हात वाघ- मानव संघर्ष टोकाला पोहचला आहे. बुधवारला वाघाच्या हल्यात दोघांचा जीव गेला होता. या घटनेला अद्याप चोवीस तास उलटले नसताना आज वाघाच्या हल्ल्यात शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. स्वरूपा येलटीवार (५०) असे मृतक महिलेचे नाव आहे. कापूस वेचत असतानाच वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात घटनास्थळी त्यांच्या मृत्यू झाला. वाघांच्या जिल्हा अशी ओळख असलेल्या चंद्रपुरात वाघानीच आता दहशत पसरवली आहे.

सध्या कापूस वेचणीच्या हंगाम सुरू आहे. कापूस वेचणीसाठी शेतात मोठ्या संख्येने शेतमजूर जात आहेत. सावली तालुक्यात येणाऱ्या खेडी गावातील येथील स्वरूपा येलटीवार या कापूस वेचानिसाठी गेल्या होत्या. कापूस वेचत असतानाच वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात स्वरूपा येलटीवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेने दहशत पसरली आहे.

बुधवारला सावली आणि मूल तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात दोघांचा बळी गेला होता. वाघ, वन्यजीवांच्या हल्ल्यात वाढ झाली आहे. सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे जंगलात असलेल्या गावात दहशत पसरली आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment