एकूण नगरसेवक-139
तीन सदस्यांचे 45 प्रभाग
चार सदस्यांचा एक प्रभाग
पुणे,दि.1: राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सर्वांचे लक्ष लागलेली पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रभाग रचना आज (मंगळवारी) प्रसिद्ध झाली. 139 नगरसेवक संख्येसाठी तीन सदस्यांचे 45 तर चार सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे. भौगोलिकदृष्ट्या प्रभाग क्रमांक पाच च-होली सर्वांत मोठा तर सॅण्डविक कॉलनी, रामनगर सर्वांत छोटा प्रभाग असणार आहे.
असे आहेत प्रभाग
प्रभाग क्रमांक 1 – तळवडे, रुपीनगर, त्रिवेणीनगर,
प्रभाग क्रमांक 2 – चिखलीगावठाण, मोरेवस्ती, कुदळवाडी
प्रभाग क्रमांक 3 – बो-हाडेवाडी, जाधववाडी
प्रभाग क्रमांक 4 – मोशी गावठाण, डुडुळगाव, गंधर्वनगरी
प्रभाग क्रमांक 5 – च-होली, चोविसावाडी, वडमुखवाडी
प्रभाग क्रमांक 6 – दिघी, गणेशनगर, बोपखेल
प्रभाग क्रमांक 7 – सँण्डविक कॉलनी, रामनगर
प्रभाग क्रमांक 8 – भोसरी गावठाण, गवळीनगर, शितलबाग
प्रभाग क्रमांक 9 – धावडेवस्ती, चक्रपाणी वसाहत
प्रभाग क्रमांक 10 – इंद्रायणीनगर, लांडेवाडी, शांतीनगर, गव्हाणेवस्ती
प्रभाग क्रमांक 11 – गवळीमाथा, बालाजीनगर
प्रभाग क्रमांक 12 – घरकुल, नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती
प्रभाग क्रमांक 13 – मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती
प्रभाग क्रमांक 14 – यमुनानगर, फुलेनगर
प्रभाग क्रमांक 15 – संभाजीनगर, पूर्णानगर, शाहूनगर
प्रभाग क्रमांक 16 – नेहरुनगर, विठ्ठलनगर, यशवंतनगर
प्रभाग क्रमांक 17 – वल्लभनगर, एच.ए.कॉलनी, संत तुकारामनगर, महात्मा फुलेनगर
प्रभाग क्रमांक 18 – मोरवाडी, एम्पायर इस्टेट, अजमेरा कॉलनी, गांधीनगर, खराळवाडी
प्रभाग क्रमांक 19 – चिंचवड स्टेशन, दत्तनगर, मोहननगर, इंदिरानगर, आनंदनगर
प्रभाग क्रमांक 20 – काळभोरनगर, विद्यानगर, रामनगर, दत्तनगर, अजंठानगर
प्रभाग क्रमांक 21 – आकुर्डीगावठाण, गंगानगर, दत्तवाडी
प्रभाग क्रमांक 22 – ओटास्कीम, निगडी गावठाण, साईनाथनगर
प्रभाग क्रमांक 23 – वाहतूकनगरी, भक्ती-शक्ती, केंद्रीय वसाहत
प्रभाग क्रमांक 24 – मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत
प्रभाग क्रमांक 25 – वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा, शिंदेवस्ती
प्रभाग क्रमांक 26 – बिजलीनगर, दळवीनगर, भोईरनगर, चिंचवडेनगर
प्रभाग क्रमांक 27 – चिंचवडगाव, उद्योगनगर, प्रेमलोक पार्क, प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह
प्रभाग क्रमांक 28 – केशवनगर, यशोपुरम, श्रीधरनगर
प्रभाग क्रमांक 29 – भाटनगर, मिलिंदनगर, पिंपरी कॅम्प, जिजामाता हॉस्पिटल
प्रभाग क्रमांक 30 – पिंपरीगाव, अशोक थिएटर, वैभवनगर
प्रभाग क्रमांक 31 – काळेवाडी, विजयनगर, नढेनगर
प्रभाग क्रमांक 32 – तापकीरनगर, रहाटणी, ज्योतिबानगर
प्रभाग क्रमांक 33 – रहाटणी, रामनगर, शिवतिर्थनगर
प्रभाग क्रमांक 34 – बापुजीबुवानगर, ज्ञानेश्वर कॉलनी, अशोका सोसायटी
प्रभाग क्रमांक 35 – थेरगाव, बेलठिकानगर, पवारनगर
प्रभाग क्रमांक 36 – गणेशनगर, संतोषनगर, पद्मजी पेपर मिल
प्रभाग क्रमांक 37 – ताथवडे, पुनावळे, काळाखडक
प्रभाग क्रमांक 38 – वाकड, भुमकरवस्ती, कस्पटेवस्टी, वाकडकर वस्ती
प्रभाग क्रमांक 39 – पिंपळेनिलख, विशालनगर, वेणुनगर, पोलीस लाईन, कावेरीनगर
प्रभाग क्रमांक 40 – पिंपळेसौदागर, कुणाल ऑयकॉन, प्लॅनेट मिलेनियम
प्रभाग क्रमांक 41 – पिंपळेगुरव गावठाण, जवळकरनगर, वैदुवस्ती
प्रभाग क्रमांक 42 – कासारवाडी, फुगेवाडी, कुंदननगर, वल्लभनगर
प्रभाग क्रमांक 43 – दापोडी, गणेशनगर, महात्मा फुलेनगर
प्रभाग क्रमांक 44 – पिंपळेगुरव, काशिदनगर, मोरया पार्क
प्रभाग क्रमांक 45 – नवी सांगवी, किर्तीनगर, विनायकनगर, गजानन महाराज नगर
प्रभाग क्रमांक 46 – जुनी सांगवी, ममतानगर, जयमालानगर, शितोळेनगर
दरम्यान, प्रभाग रचना करताना नदी, उड्डाणपुल, रेल्वेलाईन, रस्ते अशा नैसर्गिक, भौगोलिक सीमांचे पालन केले असल्याचे निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले