विदर्भ

वारकरी संघटना प्रमुखांनी घेतली थेट मुख्यमंत्र्यांची भेट

नागपूर – नागपूर येथे मुख्यमंत्री यांचे निवासस्थान रामगिरी बंगल्यावर धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष ह भ प अक्षय भोसले यांच्या माध्यमातून विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष व गणेश शेटे व इतर दहा वारकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नुकतीच बैठक पार पडली. यामध्ये वारकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री यांना वारकरी फेटा बांधून विना व गजानन विजय ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. व सर्व वारकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र संतांची शूरवीरांची भूमी आहे. पण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये महापुरुषांवर, देवी देवतांवर, संत महंतावर गरड ओकत असल्यामुळे काही धार्मिक संघटना, राजकीय पक्ष, आपापल्या परीने निषेध, मोर्चा, आंदोलने करीत असतांना दिसत आहे. त्यामध्ये आम्ही वारकरी मंडळी सुद्धा सहभागी आहोत. महापुरुषांचा अपमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केला, व देवी देवतांच्या, संतमंडळीच्या बद्दल अपशब्द बोलल्याचे सुषमा अंधारे याचे व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्यामुळे, आम्ही सुषमा अंधारे यांचेविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे.

सर्व वारकरी संघटनेच्या वतीने विनंती करण्यात आली, हिवाळी अधिवेशनामध्ये कायदा पारित करण्यात यावा, यापुढे महापुरुषांबद्दल आणि कुठल्याही धर्मातील देवी देवतांबद्दल अपशब्द वापरल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. लव्ह जिहाद सारख्या प्रकरणाला आळा बसण्याकरिता कायदा पारित करण्यात यावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांना महाराष्ट्राबाहेर काढण्यात यावे.

सुषमा अंधारे यांनी देवी देवता, संत मंडळी यांच्याबद्दल धार्मिक भावना दुखल्याने बऱ्याच ठिकाणी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. परंतु अद्याप त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. जनतेने सर्व पक्षातील राजकीय मंडळींना महाराष्ट्राचा विकास जनतेच्या समस्या, शेतकऱ्यांच्या मालाला भाव असे बरेच विषय आहेत, त्याकरिता त्यांना निवडून दिलेले आहे. आपण स्वतः विधीमंडळात सर्व पक्षीय राजकीय नेत्यांना समज द्यावा महापुरुषांवर, देवी देवतांवर टीका केल्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासावर लक्ष द्यावे अश्या आशयाचे पात्र मुख्यमंत्री यांना देण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित सर्व महाराज मंडळी,( संस्थापक अध्यक्ष विश्व वारकरी सेना ) गणेश शेटे, ( अध्यक्ष वारकरी प्रबोधन समिती ) रमेश वाघ, ( विठ्ठल रुक्मिणी संस्था सचिव कौंडन्यपुर ) सदानंद साधू , ( आश्रम इसरूळ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा ) चोखोबा राय ,पुरुषोत्तम पाटील,सोपान शास्त्री, योगेश सुरळकर.

( अध्यक्ष हनुमान मंदिर संस्थान केळीवेळी ) माधवराव बकाल. ( विदर्भ प्रमुख राष्ट्रीय वारकरी परिषद ) ओमदेव चौधरी. ( जिल्हा अध्यक्ष विश्व वारकरी सेना अमरावती ) विठ्ठल चौधरी. (सदस्य विश्व वारकरी सेना नागपूर ) ,यश नागपुरे, ( राज्य संघटक महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ युवा शाखा व हिंदू राष्ट्र सेना वारकरी आघाडी ), किरण शिंदे,( युवा शाखा वारकरी महामंडळ विदर्भ प्रमुख ) आकाश भुतेकर, ( महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ जिल्हा कार्याध्यक्ष बुलढाणा व हिंदुराष्ट्र सेना राज्य कार्यकारणी सदस्य ), गजानन उन्हाळे, ( जिल्हा कार्यकारणी सदस्य वारकरी महामंडळ बुलढाणा ), एकनाथ तायडे.

( सिद्धिविनायक गणपती संस्थान वायगाव ता. भातकुली जि. अमरावती ) विश्वेश्वर इंगोल. ( वारकरी महामंडळ वर्धा जिल्हा सचिव ) सारंगधर बोंडे, दिनकर पाटील .( अखिल भारतीय वारकरी महामंडळ वर्धा जिल्हा अध्यक्ष ) प्रवीण काटकर, मयूर दरने. ( महाराष्ट्र वारकरी महामंडळ वर्धा जिल्हा अध्यक्ष राहुल बीहजारे ) .( जिल्हाध्यक्ष विश्व वारकरी सेना वर्धा ) , प्रकाश खंडारे यांची उपस्थिती लाभली.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment