कोंकण

वारकरी संप्रदायाकडून अंधारेंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

ठाणे – शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्यावरून ठाण्यातील वारकरी संप्रदायात नाराजगी व्यक्त केली आहे. यावेळी वारकरी संप्रदाया कडून सुषमा अंधारे यांच्या प्रतिमेला जोडे मारून आपला निषेध व्यक्त केला. यावेळी सुषमा अंधारे यांच्या विरोधात वारकरी संप्रदायाकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

सध्या महाराष्ट्रात महापुरुष, संत आणि ज्येष्ठांच्या विरोधात बेताल वक्तव्य केली जात आहे आणि त्याच कारणाने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अस्थिर झाले आहे. त्यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील संतांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून वारकरी संप्रदायात नाराजीचे वातावरण पसरले आहे. या सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ वारकरी संप्रदाय आक्रमक झालेला पाहायला मिळाला आहे. पुण्यात सुषमा अंधारे यांच्या निषेधार्थ प्रतीकात्मक अंतयात्रा काढत संतप्त वारकर्यांनी निषेध नोंदवला होता. त्याच पाठोपाठ आता ठाण्यात देखील वारकरी संप्रदायाच्या वतीने सुषमा अंधारे यांच्या प्रतिमेला जोडे मारून आपला निषेध व्यक्त केला. महाराष्ट्रातील संतांचा उपदेश जगभर प्रसिद्ध आहे. पंजाबमध्ये देखील गुरु ग्रन्थ साहेब यांच्या ग्रंथात देखील नामदेव महाराजक यांचे नाव आहे. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या १६ व्य वर्षी चमत्कार केले चमत्कार करणारे ते जादू टोन करणारे बाबा न्हवते त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. गाथा अभांगाच्या माध्यमातून कीर्तन प्रवचन होतात. त्यामुळे अशा प्रकारे संतांन वरील होत असलेले वक्तव्य थामाबली पाहिजे अशी इच्छा यावेळी वारकरी संप्रदायाकडून व्यक्त केली जात आहे.

राजकारणात अशा प्रकारे होत असलेली संतावरील वक्तव्य थांबली नाहीत तर महाराष्ट्रात तीव्र आंदोलन होईल असा इशारा वारकरी सप्रदायाकडून देण्यात आला आहे. वारकरी संप्रदायाचे ह. भ. प. विलास फापाळे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील नितीन कंपनी येथील कोरम मॉल जवळ हे निषेध आंदोलन करण्यात आले. संतांवर वारंवार होत असलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे शिस्त प्रिय आणि शांत असलेला वारकरी संप्रदाय देखील महाराष्ट्रात आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment