मुंबई

आम्ही संजय राऊत यांना महत्त्व देत नाही

कल्याण – आम्ही संजय राऊत यांना महत्त्व देत नाही गरज असल्यास, आमची मदत हवी असल्यास ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये जागा आहे, आम्ही त्यांची सोय करू. अशी टीका मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली असून मलंगगडावर भगवा फडकवण्यापासून तरुणांना पोलिसांनी अडवणूक काही दिवसांपूर्वी केली होती, यावर बोलत आम्ही एक दिवस मनसे मलंगगडावर भगवा फडकवेल अस विधान केले जाधव यांनी केले आहे.

दरम्यान आज मांगरुळ गावात मनसे अंबरनाथ तालुका कार्यालयाचे उद्घाटन अविनाश जाधव यांनी केले. यावेळी उल्हास भोईर, तालुका अध्यक्ष नकुल पावशे, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अविनाश जाधव यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करत सांगितले की संजय राऊत जेव्हा जेलमधून आले, तेव्हा पासून त्यांची मानसिक स्थिती ठीक नाही आहे. ते काय बडबडतात, काय बोलतात, काही ठीक नाही. परवा नारायण राणे यांच्यावर त्यांनी टीका केली. काय बडबडत होते हे त्यांनाच कळत नव्हतं. आम्ही संजय राऊत यांना महत्त्व देत नाही. गरज असल्यास, आमची मदत हवी असल्यास ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये जागा आहे, आम्ही त्यांची सोय करू.

तसेच गेल्या काही वर्षांपासून मलंगडावर हिंदूंची परंपरा रोखण्याचा तसेच भगवा फडकवण्यापासुन रोखण्याचे प्रकार वाढले आहेत. काही जण पोलिसांवर दबाव टाकून हिंदूंच्या परंपरा रोखत आहेत. यावर आता मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव हे आक्रमक झाले असून एक दिवस मलंगगडावर भगवा फडकवेल असा इशारा दिला आहे. त्यामुळे मनसेने इशारा दिला असल्याने पोलिसांची आता पुन्हा एकदा तारेवरची कसरत होणार आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment