पश्चिम महाराष्ट्र

खासदार उदयनराजे भोसले नेमकी कोणती स्वतंत्र व्यवस्था उभारणार?

आज करणार नवी घोषणा म्हणत केलेली पोस्ट केली डिलीट तरीही राज्याचे लक्ष राहिलेय लागून

By अनुराधा कदम

आपल्या बेधडक विधानाने आणि वर्तनाने कायमच चर्चेत असलेले तसेच माझे राजकीय आस्तित्व भाजपमुळे असले तरी माझे निर्णय घेण्यासाठी मी नेहमीच स्वतंत्र संस्थानाप्रमाणे काम करतो असे म्हणून राज्यातील अनेक घडामोडींवर प्रखर भाष्य करणारे भाजपचे खासदार व सातारचे शाही व्यक्तिमत्व उदयनराजे यांनी सोशलमीडियावर आज सायंकाळी एक घोषणा करणार असल्याची पोस्ट केली होती. 

या पोस्टची चर्चा चांगलीच रंगली. काहीवेळापूर्वी उदयनराजे यांनी ही पोस्ट डिलीट केली असली तरी आज सायंकाळी 6 वाजता सातारा येथील राजधानी चौकातील गांधीमैदानावर ते काय घोषणा करणार आणि कोणती नवी व्यवस्था उभारणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे.

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे मोठी घोषणा करणार आहेत. त्यामुळे ते काय घोषणा करणार याची जास्तच उत्सुकता आहे. राजकीय क्षेत्रात उदयनराजे यांच्या या नव्या भूमिकेमुळे जोरदार चर्चा सुरु आहे. आज उदयनराजे यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाचे औचित्य साधत उदयनराजे काय निर्णय घेणार, याची कमालीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

साताऱ्याचे उदयनराजे भोसले हे राज्यसभेचे खासदार आहेत. ते आजच्या वाढदिवसाचे औचित्य साधत एक मोठी घोषणा करणार आहेत, असे त्यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे. हे पत्रक त्यांनी सोशलमीडियावरही पोस्ट केले होते. 

या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की, सध्या राज्यात आरोपप्रत्यारोपांची धूळ उडत आहे. देशातील अन्य राज्ये प्रगती व विकासाच्यामार्गाने जात असताना महाराष्ट्रात राजकीय चिखलफेक सुरू आहे. त्यामुळे माझी पोस्ट वाचून अनेकांच्या मनात ही शंका आली असेल की मी सध्याच्या राजकीय वातावरणावर भाष्य करणार आहे. पण तसे नाही. 

सध्या जे काही सुरू आहे त्याच्याशी माझ्या नव्या निर्णयाचा काही संब्ंध नसून मी एक नवा उपक्रम करणार आहे. हा उपक्रम म्हणजे एक स्वतंत्र व्यवस्था असेल. त्यासाठी आज वाढदिवसाचा दिवस मी निवडला आहे.

उदयनराजे यांनी असं म्हटलं आहे की, आपण सारेच आपल्या भोवती सुरूअसणाऱ्या घटना पाहत असतो. काही अयोग्य वाटल्या तर त्या कोणीतरी दुरुस्त करेल अशी केवळ इच्छा आपण व्यक्त करत असतो. 

आम्ही मात्र एका सामाजिक प्रश्नावर गेली अनेक वर्षे प्रशासकीय बदलांसाठी अनेक प्रयत्न केले. पण ते पुरेसे नाहीत. गेल्या काही दिवसांच्या चिंतनातून आम्ही या प्रश्नाचे उत्तर म्हणून स्वतःच एक व्यवस्था उभी करण्याचे ठरविले आहे.

कोणता प्रश्न, काय व्यवस्था अशा प्रश्नांच्या उत्तरांसाठी आज सायंकाळी सहा वाजण्याची वाट पहा असे सांगत त्यांनी घोषणेबाबत गूढ कायम ठेवले आहे. त्यामुळे ते आज काय बोलणार आणि काय घोषणा करणार याचीच साताऱ्यात जोरदार चर्चा आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment