मराठवाडा

या पगडी मागे दडलंय काय ?

जालना – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि अमोल कोल्हे यांची आज जालन्यात भेट झाली आणि रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांच्या कन्स्ट्रक्शन कार्यालयाचे अमोल कोल्हे यांच्या हस्ते उद्घाटन देखील करण्यात आले. विशेष म्हणजे या उद्घाटनानंतर दोन्ही नेत्यांमध्ये दानवे यांच्या गाडीतच तबल २५ मिनिटे गुप्त चर्चा झाल्याचे कळते आहे, मात्र या चर्चेचा तपशील कळू शकला नाही. रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांच्या कार्यालयातील उद्घाटनाच्या प्रसंगी अमोल कोल्हे यांच खास अशी पेशवा पगडी देऊन स्वागत करण्यात आले.

या भेटी बाबत माहिती घेतली असता औरंगाबाद येथे २३ ते २८ दरम्यान शिवपुत्र संभाजी महानाट्य होणार असून याच निमंत्रण देण्यासाठी अमोल कोळेंचीही भेट असल्याची माहिती मिळाली असली तरी रावसाहेब दानवे हे मुरब्बी राजकारणी असल्याने राजकारणातील जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment