पॉझिटिव्हिटी रेट २.०५ टक्क्यांवर, भारतात गेल्या २४ तासांत ३८ हजार नव्या रुग्णांची नोंद
देशात सध्याच्या घडीला ३ लाख ८७ हजार ६७३ अक्टिव्ह रुग्ण आहेत
भारतात गेल्या २४ तासांत ३८ हजार ६६७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर ४७८ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय गेल्या २४ तासांत ३५ हजार ७४३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. देशात सध्याच्या घडीला ३ लाख ८७ हजार ६७३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत ३ कोटी १३ लाख ३८ हजार ८८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
देशाचा रिकव्हरी रेट सध्या ९७.४५ टक्के इतका आहे. देशात सध्या आठवड्याला पॉझिटिव्हिटी रेट २.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर आतापर्यंत ५३ कोटी ६१ लाख लोकांचं लसीकरण झालं आहे.
महाराष्ट्रातील आकडेवारी
राज्यात करोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. करोना विषाणू पसरण्याचा वेग मंदावल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर करोना लसीकरण मोहीम वेगाने सुरु आहे. शुक्रवारी राज्यात ५ हजार ८६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण ६१ लाख ८० हजार ८७१ करोना बाधित रुग्णांनी करोना मात केली आहे. यामळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.८५ % एवढे झाले आहे.
दुसरीकडे शुक्रवारी राज्यात ६ हजार ६८६ नवीन रुग्णांची नोंद झाली. २४ तासात राज्यात १५८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यू दर २.११ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ५ लाख ४५ हजार ५५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३ लाख ८२ हजार ०७६जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ७० हजार ८९० व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत. तर २ हजार ६७६ व्यक्ती सांस्थातमक क्वारंटाईनमध्येआहेत. राज्यात ६३ हजार ००४ रुग्ण सक्रिय आहेत.
तसेच महाराष्ट्रात आतापर्यंत ४ कोटी ७९ लाख ३८ हजार २५४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. १२ ऑगस्ट रोजी १ लाख८३ हजार ५०६ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
![]() | ReplyForward |