कोल्हापूर -तिरवडे, ता. भुदरगड येथील ग्रामपंचायत निवडणूक प्रचारामध्ये विना परवाना सुरू असलेल्या प्रचार सभेत मतदारांना व विरोधी उमेदवारांना जिवे मारण्याची धमकी माजी आमदार दिनकरराव जाधव यांचे चिरंजीव विश्वजित जाधव यांनी दिली.
सन २०२२ ते २०२७ पंचवार्षिक निवडणूकी करीता तिरवडे-कुडतरवाडी गुप ग्रामपंचायतचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असून सदर निवडणुकीचे मतदानाची तारीख १८ / १२ / २०२२ ही आहे. प्रस्तुत ग्रामपंचायत तिरवडे गावातील लोकनियुक्त सरपंच या प्रभागात माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या स्नुषा शुभांगी विश्वजीत जाधव निवडणुक लढवत आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने दि.१३/ १२ / २०२२ रोजी रात्री ८-०० वा. कोणतीही कायदेशीर प्रशासकीय परवानगी न घेता बेकायदेशीररित्या शुभांगी जाधव यांचे सांगणेवरुन विश्वजीत जाधव यांनी तिरवडे येथील लोकांचा जमाव करुन कुदरवाडी या ठिकाणी रात्री सभा घेतली. यावेळी मतदारांना व विरोधी पॅनेलच्या उमेदवारांना “मागच्या वेळी वाचलास” काय वाट्टेल ते झाले तरी आम्हाला येथे “शुभांगीची शिट निवडून येणे गरजेचे आहे जर शुभांगीच काय झाल तर इथे वाईट परिणाम होणार एवढच सांगतो” असे म्हणून सामाजिक शांतता भंग करण्याचे व कायदेशीर सुव्यवस्था बिघडवणेचे उद्देशाने प्रक्षोबक वक्तव्य केलेले आहे. तसेच मतदारांना धमकावून भिती दाखवून आचारसंहीता भंग केलेली आहे.
अशा वक्तव्यामुळे मतदारांच्या मनामध्ये भितीची व दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. सदरचा प्रकार हा अत्यंत गंभीर असून निवडणूकीच्या कालावधीमध्ये उमेदवारांच्या प्रतिनिधीनी मतदारांना जाहीर पध्दतीने धमकावले. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांच्यावर कायदेशीर फौजदारी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधिक्षक कोल्हापूर यांचेकडे तक्रार देत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी माजी सभापती यशवंत उर्फ बाबा नांदेकर यांनी केली आहे.