महाराष्ट्र

पत्नी सकाळी झोपेतून उठताच …समोर जे दिसलं ते धक्कादायकच

जळगाव – शहरातील हरिविठ्ठल नगरात पत्नी मुलांसह कुटुंबिय घरात झोपलेले असतांना मध्यरात्री ३६ वर्षीय तरूणाने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना शनिवारी रोजी सकाळी ७ वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. मुकेश वासुदेव अहिरे वय ३६ असे मयत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुकेश अहिरे हा तरूण पत्नी व मुलांसह वास्तव्यास होता. मेडिकल स्टोअरमध्ये काम करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करायचा. शुक्रवारी मध्यरात्री कुटूंबिय झोपलेले असताना मुकेश याने घरामध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. शनिवारी सकाळी ७ वाजता पत्नीला जाग आल्यावर तिला पतीने गळफास घेतल्याचे दिसून आले. यानंतर तिने एकच आक्रोश केला. घराजवळ राहणा-या नातेवाईकांना बोलवून त्यांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्‍यांनी तपासणीअंती मुकेश यांना मृत घोषित केले. मुकेश याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, तीन भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment