विदर्भ

पत्नीच्या प्रियकरावर पतीने केला चाकूहल्ला;दृश्य कॅमेरात कैद

चंद्रपूर – संशयाचे भूत डोक्यात शिरलं की माणूस राक्षस होऊन जातो. याचा प्रत्यय जिल्ह्याला आला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीच्या तथाकथित प्रियकरावर चक्क मार्केटमध्ये चाकूहल्ला केल्याची थरारक घटना गडचांदूर येथे घडली.या घटनेत गंभीर जखमी झालेल्या प्रियकराला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. भास्कर कांबळे याला ताब्यात घेतले आहे.

गडचांदूर येथील रहिवासी भास्कर कांबळे व त्याच्या पत्नीच्या घटस्फोटासाठी खटला सुरू आहे. त्यांची पत्नी बिबी येथील दिनेश काळे यांच्या घरी राहत होती . गेल्या एक वर्षापासून वेगळे असलेल्या पतीने पत्नीचा तथाकथित प्रियकर दिनेश काळे याला गडचांदूर येथे मुलाच्या अडमिशनचे काम असल्याचे सांगून आपल्या पत्नीला सोबत घेऊन ये , असे सांगितले . तो आला असता त्याच्यावर गुजर झेरॉक्स समोर भरचौकात चाकूने हल्ला केला. दिनेश काळे हा वाचवा वाचवा असे ओरडू लागला. मात्र कुणीच वाचवायला गेले नाही. त्याच वेळी एक दुचाकी तिथे आली. त्याचवेळी काळे यांनी स्वतःची सुटका करीत पळ काढला. या हल्ल्यात काळे याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी दिनेश काळे यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय , चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे. पुढील तपास गडचांदूर पोलिस करीत आहे .दरम्यान या चाकू हल्ल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमात वायरल झाला आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment