पश्चिम महाराष्ट्र

ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून महिलेचा मृत्यू

नृसिंहवाडी – नृसिंहवाडीहून शिरोळकडे दुचाकीने येत असताना पाठीमागून मोपेडला धडक दिल्याने ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून पूजा दत्तात्रय माळी (वय २२, रा.शिरोळ) ही युवती जागीच ठार झाली. ही घटना शिरोळ-नृसिंहवाडी रस्त्यावर संजय सांस्कृतिक हॉलजवळ घडली.

पूजा सुभाष पाटील आणि पूजा दत्तात्रय माळी या दोघी मैत्रिणी नृसिंहवाडी येथे धार्मिक कार्यक्रमानिमित्त गेल्या होत्या. कार्यक्रम आटोपून त्या घरी परत येत होत्या. पूजा पाटील मोपेड चालवत होती, तर पूजा माळी मागे बसली होती. दोघी संजय सांस्कृतिक हॉलजवळ उसाने भरलेला ट्रॅक्टरला ओव्हरटेक करीत असताना पाठीमागून येणार्‍या कारने मोपेडला पाठीमागून धडक दिली. यामध्ये मागे बसलेली पूजा माळी फेकली गेल्याने ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून तिचा जागीच मृत्यू झाला, तर पूजा पाटील विरुद्ध दिशेला पडल्याने किरकोळ जखमी झाली.

तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अपघातस्थळी तसेच शिरोळ ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती. रात्री उशिरा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद रात्री उशिरा शिरोळ पोलिस ठाण्यात झाली. पूजाच्या पश्चात आई-वडील, आजी-आजोबा, भाऊ असा परिवार आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment