कोंकण न्याय

रसायनी पोलिसांकडून महिला कर्मचारी जनजागृती शिबिर.

महिला कर्मचाऱ्यांना कामात होणाऱ्या महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार व महिला सुरक्षा यावर मार्गदर्शन.

चावणे येथील कोकिओ कॅमलीन कंपनीमध्ये महिला सुरक्षा जनजागृती अनुषंगाने महिला पोलिस हवालदार मानसी पाटील, महीला पोलीस नाईक /म्हात्रे यांनी शिबिरात उपस्थित महिला कर्मचाऱ्यांना कामात होणाऱ्या महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार व महिला सुरक्षा यावर मार्गदर्शन केले.

तसेच महिलासंबंधी गुन्हे व महिला अत्याचार कायदे याबाबत माहिती यावेळी दिली.

या मार्गदर्शन शिबिरात जवळपास शंभर महिला कर्मचारी उपस्थित होत्या.

कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारी व उपाययोजना यांवरही मार्गदर्शन करण्यात आले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment