बडनेरा :- भारत हा कृषि प्रदान देश असून ग्रामीण भागात आज ८० टक्के लोक शेती ला प्राथमिकता देतात शेती ला जर पूरक व्यवसायाची जोड दिली तर शेतकऱ्याचे आर्थिक स्थिती अजून मजबूत होते आज हजारो तरुण आपली वडिलोपार्जित पारंपरिक शेती न करता. नवनवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन आधुनिक शेतीकडे वळलेले दिसून येत आहेत.
याच बरोबर शेतकरी हे नगदी पिकाला प्राध्यान्य देताना दिसून येत आहे. अशातच रेशीम शेतीला नगदी पीक म्हणून नवीन पिढी कडे एक मोठी संधी आहे. परंतु शेतकरी हा जरी माल पिकवत असला तरी त्या पिकाला लागणारी बाजारपेठ आणि योग्य भाव मिळणे फार महत्वाचे असते अशातच आता विदर्भ वासियांची चिन्ता मिटली आहे असे नुकत्याच अमरावती स्थित बडनेरा कृषि उत्त्पन्न बाजार समिती मध्ये सुरु झालेल्या रेशीम बाजार वरुण दिसून येत आहे या रेशीम बाजारपेठे मुळे निश्चितच विदर्भ वासीयायांना दिलासा मिळाला आहे पूर्वी बाहेर राज्यात नेऊन रेशीम पीक विकावे लागत होते परंतु आता जवळच बाजार पेठ उपलब्ध झाल्याने विदर्भात रेशीम शेती ला चालना मिळेल अशी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.