खान्देश

तरुणी आत्महत्या करत होती बघे मोबाईल मध्ये कैद करत होते

खान्देश – शिरपूर येथील सावळदे तापी पुलावरून तीस वर्षीय विवाहितेने चपला व ओढणी पुलावरच काढून ठेवत उडी मारून आत्महत्या केली आहे. या धक्कादायक घटनेचा सर्व थरार पुलावर असलेल्या काही जणांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला आहे, उडी मारल्यानंतर देखील ही तरुणी बराच वेळ आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे. परंतु त्यावेळेस बघ्यांपैकी कोणीही या तरुणीला वाजवण्याचा प्रयत्न देखील केला नाहीये, फक्त पुलावरून तिला सूचना देण्यात व व्हिडिओ काढण्यातच बघ्यांनी धन्यता मानली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दुपारी २-३ वाजेच्या सुमारास मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरील शिरपूर तालुक्यातील सावळदे तापी नदी पुलावरून तरुणीने उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा पुलावरुन जाणाऱ्या एका प्रवासीने व्हिडीओ काढला आहे आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून घटनास्थळा वरून तरुणीची चप्पल व ओढणी मिळुन आली आहे.

मात्र आत्महत्या करणाऱ्या या तरुणीला सूचना देण्याऐवजी व व्हिडिओ काढण्या ऐवजी तिचे प्राण वाचविण्यासाठी बघ्यांपैकी कोणी पुढे आले असते तर संबंधित तरुणीचे प्राण वाचू शकले असते, परंतु बघणाऱ्यांपैकी कोणीही तिला वाचवण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केला नाही. संबंधित तरुणीची ओळख पटली असून ही तरुणी शिंदखेडा तालुक्यातील हातनुर येथील असून, या तरुणीने टोकाची भूमिका का घेतली याचं कारण अद्याप समजू शकले नाहीये. या तरुणीचा मृतदेहाचे शोधकार्य सुरू आहे, परंतु अद्यापही या तरुणीचा मृतदेह सापडलेला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment