अमरावती – सध्याच्या युगात कधी काय घडेल आणि कुठल्या नात्याला कालीमा फासल्या जाईल याचा काही अंदाज नाही. लहान मुली पासून सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत कोणीही सुरक्षित नसल्याचा प्रत्यय पुन्हा अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात आला आहे. आई मोठ्या बहिणीच्या प्रसूती करिता बाहेरगावी गेली असताना घरात एक पंधरा वर्षे मुलगी तिच्या सावत्र वडिलांसोबत राहत होती. आई घरी नसल्याने ह्या चिमुकल्या मुलींनी घरची सगळी कामे सांभाळत आपल्या वडिलांची सेवा केली मात्र या नराधा पित्याने बापाच्या नात्याला काळीमा फासत भयंकर कृत्य केले पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सावत्र बापाने १५ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना वरूड तालुक्यात घडली. वरूड पोलिसांनी २८ वर्षीय आरोपीविरुद्ध बलात्कार व पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल केला.
मुलीची आई मोठ्या बहिणीच्या प्रसूतीसाठी गेली. यामुळे पीडिता ही सावत्र बापासमवेत घरी एकटीच होती. घरात एकटीच असलेली मुलगी कामे आटोपून हॉलमध्ये बसली असताना सावत्र बाप तेथे आला. तिला धमकावत त्याने अतिप्रसंग केला. वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपीने एक दोन दा नव्हते तर १ ते ६ जानेवारीपर्यंत वारंवार अतिप्रसंग केला. आई परत आल्यानंतर तिने ही बाब तिला सांगितली. अखेर तिने ७ जानेवारी रोजी सायंकाळी वरूड पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. महिला पोलिस अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल करून घेत तातडीने सूत्रे हलवत आरोपीला अटक केली. असुन पुढील तपास सुरू आहे.